Chal re bhoplya tunuk tunuk

एक खूप मोठे जंगल होते त्यामध्ये एक म्हातारी राहत होती. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक रहायची दुसर्या गावाला. रस्त्यानं जाताना मधेच एक मोठे जंगल होत. ते जंगल पार करावे लागत असे म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. थोडा रस्ता चालल्या नंतर वाटेत तिला एक कोल्हा भेटला. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे, मी तुला खाऊ का?'. पण म्हातारी हुषार होती.

Chal-re-bhoplya-tunuk-tunuk
Chal-re-bhoplya-tunuk-tunuk

            ती म्हणाली 'मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, जाड-जुड होते, मग मला खा.' कोल्ह्याला म्हातारीचे म्हणणे पटले. म्हातारी पुढे निघाली. तिला वाटेत भेटला वाघ. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे, मी तुला खाऊ का?'. त्याने डरकाळी फोडली. म्हातारी त्याला म्हणाली 'मला खाऊन तुझे पोट भरणार नाही.त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, जाड-जुड होते, मग मला खा. ' वाघाची अशी समजूत काढून म्हातारी पुढे निघाली. लेकीकडे गेली. 'chal-re-bhoplya-tunuk-tunuk'

Chal-re-bhoplya-tunuk-tunuk
Chal-re-bhoplya-tunuk-tunuk

           ती खूप दिवस मजेत राहिली. खाऊन पिऊन जाड-जुड झाली. थोडया दिवसांनी  तिला वाटले की आपण आपल्या घरी जावे तेव्हा तिला आठवले की  कोल्हा आणि वाघ आपल्याला खाणार आहे . तिने हे सर्व आपल्या लेकीला सांगितले  मग लेकीने तिला जादूचा भोपळा दिला . आपल्या घरी परत येताना तिने एक मोठा लाल भोपळा घेतला. त्यात बसून ती भोपळयाला म्हणाली ' चल रे भोपळया टुणुक टुणुक'. भोपळा रस्त्याने निघाला. वाटेत वाघाने भोपळा पाहिला. तो म्हणाला भोपळ्या भोपळ्या म्हातारी ला पाहिले का? आतून म्हातारी म्हणाली 'कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी. 'चल रे भोपळया टुणुक टुणुक'. त्याबरोबर भोपळा जोरात पळू लागला.

chal re bhoplya   

         थोडं  पुढे गेल्यावर वाटेत कोल्हा भेटला. तो म्हणाला भोपळ्या भोपळ्या म्हातारी ला पाहिले का? आतून म्हातारी म्हणाली 'कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी. कोल्ह्यानेही भोपळयाला थांबवण्याचा प्रयत्न केला.

           पण म्हातारी आतून म्हणाली 'चल रे भोपळया टुणुक टुणुक!'. पुन्हा भोपळा जोरात पळू लागला. 'chal re bhoplya tunuk tunuk'

कोल्हा आणि वाघाच्या तावडीत म्हातारी काही सापडली नाही. भोपळयात बसून ती सुखरूप आपल्या घरी पोचली.

अशी होती म्हातारी हुषार.

Chal re bhoplya tunuk tunuk